loader image

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

Oct 7, 2021


अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे राहणारे ५० ते ६० कुटुंबाचा गावाशी संपर्कच तुटला होता,तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य श्री अलकेश कासलीवाल यांच्याशी संपर्क साधून व्यथा सांगीतली,त्यांना शेतीमाल वाहतूक करणे मजूर ने आण करणे ,दुग्धव्यवसाय सगळंच ठप्प झालं होतं,
सदर रस्त्यावर खर्च करणे ग्रामपंचायत ला शक्य नव्हतं,,जिल्हा परिषद तातडीने काम करणार नाही म्हणून अंकाईचे सरपंच सौ नागिना कासलीवाल, उपसरपंच शिवम अहिरे,सदस्य डॉ प्रितम वैद्य,अलकेश कासलीवाल,सागर सोनवणे व संतोष टिटवे यांनी स्वखर्चाने जेसिबी दिला व तेथील ग्रामस्थ दत्तू सोनवणे,भगवान जाधव,विलास जाधव,बाळू सोनवणे,पारुबा राऊत,सागर देवकर,बाळू जाधव,नंदू जाधव,नितीन देवकर,रवींद्र जाधव,आदींनी आपला ट्रॅक्टर देऊन शाम व्यापरे, किरण बडे, मारुती वैद्य,भगवान जाधव,किरण देवकर,अण्णा जाधव,शांताराम वैद्य,सचिन जाधव,शंकर चव्हाण व सर्व तरुणांनी मिळून रस्त्याचे काम पूर्ण करून प्रशासनाचे लाखो रुपये वाचवले व स्वतःच्या समस्या वर स्वतःच मार्ग काढत सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे,येवला तहसीलदार प्रमोदजी हिले,भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक लोखंडे साहेब,बीडीओ उन्मेष देशमुख,सभापती प्रविणजी गायकवाड आदींनी सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांचे कौतुक करत अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.