सध्या देशात गाजत असलेल्या लखीमपुर खीरी येथे झालेल्या घटनेचा मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री अटक केली आशिष मिश्रा याने शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आपली कार चालवून त्यांना चिरडून ठार मारण्याचा सैतानी प्रकार केला त्यात काही निष्पाप शेतकऱ्यांचे प्राणहि गेले तसेच अनेक शेतकरी जखमी सुद्धा झाले. पोलिसांनी सुमारे बारा तास आशीष मिश्रा यांची कसून चौकशी केली असून सुरेश मिश्रा वर हत्या तसेच भरधाव गाडी चालवण्याचा आरोप असून आशिष मिश्रा हा पोलिसांना चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याबद्दल डी आय जी अतुल अग्रवाल यांनी त्याला अटक केली.
छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इंफाळ मणिपूर येथे ७ ते १२ एप्रिल २०२५दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाआतील मुलींच्या शालेय राष्ट्रीय...











