नाशिक ::कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने नवरात्र काळात गरबा, दांडिया सारख्या सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच, एका सभागृहात अधिक लोकांना जमण्यासही बंदी आहे. या सर्व बाबींचे उल्लंघन करीत थेट हॉस्पिटलच्या आवारातच गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील अशोका मेडिकोव्हर या हॉस्पिटलच्या आवारात गुरुवारी रात्री गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कार्यक्रमस्थळी दाखल झाले. परवानगी नसताना १०० पेक्षा अधिक जणांचा गरबा कार्यक्रम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पुरुष आणि महिला अशा दोघांचाही त्यात समावेश होता. ही बाब अतिशय गंभीर असल्याने मुंबई पोलिसांनी हॉस्पिटलचे व्यवस्थापक, म्युझिक सिस्टीम पुरविणारे आणि गरबा आयोजक अशा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन
मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...










