Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

स्वातंत्र्यवीर सावरकर नगर मनमाड येथे नवरात्र उत्सव गरबा रास उत्साहात साजरा…..

Oct 15, 2021

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी सावरकर नगर व हुडको परिसरातील इच्छामणी नवरात्र महिला मंडळ आयोजित गरबा व रास प्रांगणात परिसरातील सर्व महिला ,लहान मुली व सर्व नागरिकांनी अतिशय  आनंदात व उत्साहात दहाही दिवस सायंकाळी दररोज गरबा रास क्रीडा चा आनंद लुटला.
यानिमित्ताने लहान मुलींसाठी व महिलांसाठी गरबा दांडियाच्या स्पर्धा आयोजित करून त्यातील विजेत्या च्या बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.
काल गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री या स्पर्धेचा निकाल घोषित करून विविध विजेत्यांना त्या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष श्री साईनाथ भाऊ गिडगे व विद्यमान नगरसेविका सौ सविता ताई गिडगे यांचे तर्फे बक्षीस वितरण करण्यात आले.                                             , या कार्यक्रमात सौ कीर्ती मकवाने, सौ गीता दिंडे, सौ रेखा गिडगे , सौ पाठक.. तसेच मंडळाचे कार्यकर्ते श्री संतोष दिंडे, यशवंत तुपे , सोनवणे सर ,सागर सरोदे, राजेश पाटणे, अजय मोरे ,सूर्यवंशी सर ,सुतार सर ,किरण कवडे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज ठोंबरे सर यांनी केले. याप्रसंगी मनमाड शहरातील असंख्य भाविक उत्साहाने उपस्थित होते. व सर्वांनी नवरात्रोत्सवाचा आनंद घेतला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]