Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विजयदशमी निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन शस्त्र पुजन !

Oct 16, 2021

मनमाड : विजयादशमी म्हणजेच दसरा निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मनमाड येथील संत गजानन महाराज मंदिर येथे शस्त्रपुजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असणारा विजयादशमी उत्सव दरवर्षी संघ स्वयंसेवकांकडुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, 1925मध्ये विजयादशमीच्या मुहुर्तावर संघाची स्थापना झाली होती. आज संघाचा 96 वा स्थापना दिवस असुन संघ आपल्या शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करत आहे.

आज मनमाड शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन शस्त्रपुजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन के. आर. टी. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दिपक व्यवहारे सर आणि प्रमुख वक्ते म्हणुन संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह प्रचारप्रमुख श्री विकास फडके हे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे श्री व्यवहारे सर यांनी आपल्या भाषणात संगीतले की संघाचे काम हे समाजासाठी असुन जेव्हा कधी समाजामध्ये आपत्ती स्वरूप परिस्थिती असते, तेव्हा संघाचे स्वयंसेवक हे समाजाच्या मदतीसाठी पुढे येत असतात, सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये देखील संघाच्या स्वयंसेवकांनी कुठलाही दिखावा नकरता समाजासाठी काम केले आहे.

प्रमुखवक्ते श्री विकास फडके उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना सांगितलेकी संघाची स्थापना ही समाजाच्या प्रगतीसाठी झाली असुन अनेक प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून आज संघ 96 वर्ष पुर्ण करून 97 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद हे आपले आदर्श असुन यांची प्रेरणा घेऊन स्वयंसेवकांनी आपले काम करत राहावे.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि स्वयंसेवकांकडून शस्त्रपुजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

मनमाड शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मालेगाव नाका...

read more
महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

मनमाड :- महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे दि.२७-५-२०२३ पासून खासदार भारतीताई पवार चषक टेनिस...

read more
नागरिकांनी कडक उन्हात सतर्क रहावे – ना. भारती पवार येवला येथे ना.महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न

नागरिकांनी कडक उन्हात सतर्क रहावे – ना. भारती पवार येवला येथे ना.महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न

२७२ रुग्णांची तपासणी,१५ जणांची होणार मोतीबिंदूची शस्रक्रिया येवल्यात मोफत नेत्र तपासणी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]