Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे स्टेशन प्रवेशद्वाराजवळील डीपी जळून खाक !

Oct 16, 2021

मनमाड शहरातील सर्वात रहदारीचा आणि गजबजलेला परिसर असलेल्या रेल्वे स्टेशन पार्सल ऑफीस प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या महावितरण कंपनीच्या डिपीस शुक्रवारी सायंकाळी 7:30 वा.च्या सुमारास डिपीमध्ये स्पार्क झाल्याने मोठी आग लागून डिपी जळून खाक झाली. डीपीचा मोठा आवाज होऊन अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली व भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला.

सुरुवातील आगीचे स्वरूप कमी असल्यामुळे स्थानिकांनी दुर्लक्ष केले परंतु काही वेळेतच आगीने रौद्र रूप धारण केले व आग डीपीच्या वरील भागापर्यंत पोचली. परिसरातील एका मोबाईल शॉपीचे मालकाने त्वरित वीज कंपनीस फोनद्वारे सूचना दिली तर एका सूज्ञ नागरिकाने अग्निशमनला कळविले. परंतु काही मिनिटातचं आगीने संपूर्ण डिपी भस्म झाली. मोठी आग पाहून रेल्वे स्थानकातील प्रवाशी तसेच शहरातील नागरिकांमध्ये धावपळीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कुठल्याही नागरिकास दु:खापत तसेच इतर नुकसान या आगीमुळे झाले नाही.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]