Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गिरणारे बारीत बिबट्याने केले घोडे व शिंगरु फस्त !

Oct 18, 2021

मनमाड-उमराणे या राज्य महामार्गावरिल देवळा तालुक्यातील गिरणारे शिवारात व चांदवड तालुक्यातील दरेगाव या गावाजवळील  गिरणारे घाटातुन जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच असलेल्या दरेगाव गावातील शेतकरी विनोद गांगुर्डे यांच्या गिरणारे शिवारातील शेतावर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घोडा व शिंगरु यांना जीव गमवावा लागला. सकाळच्या सुमारास येथील शेतकरी बाजीराव गायकवाड हे शेतात गेले असता त्यांना शिंगरु विव्हळत असल्याचे दिसून आले. मात्र घोडयाने आधीच आपला प्राण सोडला होता. त्यानंतर काही क्षणात शिंगरु ही मुत्युमुखी पडले. 
पावलांचे ठसे पाहता तो वाघ असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. मात्र वनविभागाने तो बिबट्या असल्याचे सांगितले आहे. सदर बिबट्याच्या पावलांबरोबरच त्याच्या बछड्याचेही पावलं दिसत असल्याने बिबट्या सोबत बछडे सुध्दा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे. यावेळी देवळा वनविभागाच्या वनरक्षक ज्योती सोनवणे, वनमजुर ईश्वर ठाकरे यांनी पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडे शवविच्छेदनासाठी घोडे व शिंगरु सोपविण्यात आले आहे. यावेळी दरेगावचे पोलीस पाटील सोमनाथ गांगुर्डे, गिरणारे येथील ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. बिबट्याच्या संचारामुळे परिसरात भितीदायक वातावरण आहे.

अजून बातम्या वाचा..

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]