Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

इंडियन आयडॉल स्पर्धेत निवड झालेल्या आम्रपाली पगारे ला मदतीचा हात …

Oct 19, 2021

सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारी नांदूर येथील आम्रपाली पगारे अर्थात येवल्याची गानकोकिळा सोनी मराठी टीव्हीवरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे.तिच्या या प्रवासाला हातभार लावण्यासाठी आज सावरगाव विद्यालयात विविध सामाजिक संस्था व व्यक्तींकडून तिला आर्थिक मदतीचा हात देऊन पाठबळ देण्यात आले.
सोनी मराठी टीव्हीवरील इंडियन आयडॉल या स्पर्धेत सहभागासाठी ऑनलाइन झालेल्या दोन्ही निवड फेऱ्यात तिची निवड झाली असून आता बुधवारी मुंबई येथे पुन्हा निवड चाचणीतून तिचे या स्पर्धेतील सहभागाचे भवितव्य ठरणार आहे.या स्पर्धेला जाण्यापूर्वी तीच्या पाठीवर हात ठेवत अनेक दानशूरांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.सावरगाव पंचक्रोशीतील पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार,गोरखआबा पवार व प्रसाद दादा पाटील यांनी देखील तिला अर्थिक मदत केली.सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस.आर.पैठणकर यांनीही मदत केली.येवल्याचे गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख यांनीही आम्रपालीला २० हजारांची मदत दिली आहे.
आज सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कुल विद्यालयात मनमाड येथील नगरसेविका सविता गिडगे, कीर्ती मकवाने,सौ.फाटक,दिंडे,मोरे व इच्छामणी महिला मंडळाच्या वतीने सात हजार शंभर रुपयाची मदत देण्यात आली.उमेश ललवाणी मित्र मंडळाच्या  वतीने देखील मदतीचा हात देण्यात आला.तसेच मनमाड येथील स्नेहलता गायकवाड, मनोज ठोंबरे आदींनी देखील मदत निधी उभारत तीला ४ हजार रुपयाची मदत आज सुपूर्द केली.सावरगाव विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी व शिक्षकांनी देखील तिच्यासाठी मदतीचा हात देत सामाजिक दायित्व निभावले आहे.सावरगाव विद्यालयाच्या प्रांगणात आज नगरसेविका गिडगे तसेच सौ.मकवाने यांच्या हस्ते हा निधी तिला सुपूर्द करण्यात आला. एकूण 12000 रुपये निधी उपलब्ध करण्यासाठी गजानन नागरे,मनोज ठोंबरे, व हेमत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी पर्यवेक्षक व्ही.एन.दराडे,मनोज ठोंबरे सर ,राजकुवर परदेशी,गजानन नागरे,उमाकांत आहेर, पोपटराव भाटे,वसंत विंचू,संतोष विंचू,ऋषिकेश काटे,मच्छिंद्र बोडके,सागर मुंडे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]