loader image

आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

Oct 20, 2021


मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आजही दिलासा मिळू शकला नाही. विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्याच्यासह आरोपी अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचे जामीन अर्जही कोर्टाने फेटाळले आहेत.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यानी आपला निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय आज न्यायाधीश पाटील यांनी दिला व तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे तिघांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे.

दरम्यान, आर्यनसाठी आजच मुंबई हायकोर्टात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात त्याची वकिलांची टीम असून एनडीपीएस कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळण्याच्या प्रतीक्षेत वकील आहेत.


अजून बातम्या वाचा..

.