loader image

उत्तर महाराष्ट्रात फटाके वाजवून दिवाळी साजरी होणार !

Oct 21, 2021


नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदीचा आदेश काल विभागीय आयुक्तांनी दिला होता, यावर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला व सदर निर्णय रद्द करण्यात आला. आता  उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे. 

विभागीय आयुक्तांच्या निर्णायामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार कि काय? असा प्रश्न नाशिक सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांसमोर उपस्थित झाला होता. तसेच लोकप्रतिनिधींसह फटाका विक्रेत्यांनीही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचं प्रमुख कारण म्हणजे, ज्या विक्रेत्यांनी गेल्या वर्षभरापूर्वीच फटाके खरेदी केले होते, त्या फटाक्यांचं काय करायचं? हा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच साधारणतः दीड वर्षानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे येणारी दिवाळी उत्साहात साजरी करावी अशी, सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र हवेची गुणवत्ता चांगली राहावी आणि माजी वसुंधरा कार्यक्रमातंर्गत अधिकाधिक निधी मिळावा, हे कारण पुढे करुन विभागीय आयुक्तांनी सुचना काढलेल्या होत्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.