loader image

पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी पेढीवर आयकर विभागाचे छापे!

Oct 21, 2021


आशिया खंडातील कांदयाची प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार कांदा व्यापारी पेढीवर आज आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. याचा परिणाम त्वरित इतर बाजार समित्यांवर दिसून आला  असून जिल्ह्यातील इतर बाजार समिती मध्ये कांदा दरात मोठी घसरण झाली असून व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या पावसामुळे नवीन खरीप कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जुन्या उन्हाळी कांदयाला चांगला दर मिळत होता. असे असतानांच आयकर विभागाने छापेमारी चालू केल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले असून आयकर विभागाने कांदा खरेदीच्या पावत्या, विक्रीची बिले, वखारीतील कांदा स्टॉक इ. कागदपत्राची चौकशी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल...

read more
रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल...

read more
.