आशिया खंडातील कांदयाची प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार कांदा व्यापारी पेढीवर आज आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. याचा परिणाम त्वरित इतर बाजार समित्यांवर दिसून आला असून जिल्ह्यातील इतर बाजार समिती मध्ये कांदा दरात मोठी घसरण झाली असून व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या पावसामुळे नवीन खरीप कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जुन्या उन्हाळी कांदयाला चांगला दर मिळत होता. असे असतानांच आयकर विभागाने छापेमारी चालू केल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले असून आयकर विभागाने कांदा खरेदीच्या पावत्या, विक्रीची बिले, वखारीतील कांदा स्टॉक इ. कागदपत्राची चौकशी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून...











