Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात डॉ. प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोरोना लसीकरण’ शिबिराचे आयोजन!

Oct 21, 2021

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय, मनमाड नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव मतदार संघाचे माजी आमदार मा. जगन्नाथ धात्रक उपस्थित होते. धात्रक यांनी आपल्या मनोगतातून लसीकरण संदर्भात मार्गदर्शन करून लसीकरणाचे महत्व व्यक्त केले व संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत दादा हिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगततून महाविद्यालय सुरू करण्यासंबंधी शासकीय नियमावलींची माहिती दिली व दोन लसींचे डोस पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात प्रवेश न देण्याच्या शासनाच्या आदेशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अल्प उपस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता महाविद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करून महाविद्यालयीन परिवारातर्फे समाजश्री डॉ. प्रशंतदादा हिरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य विभागाचे कर्मचारी श्री.दिनेश काळे ,श्री.आनंद पांडे, नगरपालिका कर्मचारी श्री अमोल बागुल व आरोग्य सेवक उपस्थित होते.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कुलसचिव श्री. समाधान केदारे, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. शिबिराच्या आयोजनात मनमाड नगरपालिका नगराध्यक्षा श्रीमती पद्मावती ताई धात्रक,सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ धात्रक, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोषजी जगताप, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे,पत्रकार आमीन शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. लसीकरण शिबिरात महाविद्यालयातील 116 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,क्रीडा विभाग व राष्ट्रीय छात्र सेना यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]