Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट !

Oct 22, 2021

नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीच्या पंचवटीतील कुमावतनगर येथे आज पहाटे साडेसहाच्या सुमारास गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटात परराज्यातून मोलमजुरीनिमित्त नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या एकाच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे समजते. 

पंचवटीतील पेठरोडवरील कुमावतनगर येथे टाईल्सचे काम करणारे परराज्यातील पाच ते सात जण राहतात. शुक्रवारी सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान टाइल्सचे काम करणाऱ्या एकाने सकाळी माचिसने बिडी पेटवली असता रूममध्ये गॅस गळती झाल्याने गॅसचा भडका झाला. या भडक्यात लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरंपाल (रा. सदर),विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्र) अशी नावे आहेत. जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात येवल्यासह इगतपुरी येथे झाले न्यायालय मंजूर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात येवल्यासह इगतपुरी येथे झाले न्यायालय मंजूर

माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती...

read more
शिंदे गटाचे प्रवक्ते भरतशेठ गोगावले यांची ढाल तलवार निशाणीवर पहिली प्रतिक्रिया

शिंदे गटाचे प्रवक्ते भरतशेठ गोगावले यांची ढाल तलवार निशाणीवर पहिली प्रतिक्रिया

सोमवारी शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले त्यानंतर आज निवडणूक आयोगाने त्यांना ढाल...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]