छगन भुजबळ यांच्या विरोधातील उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यासाठी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करून धमकाविल्याची तक्रार नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचेकडे केली होती. त्या प्रकारांची प्राथमिक चौकशी नुकतीच पूर्ण झाली. दोन्ही पक्षांकडून या प्रकरणात महत्वाचे असलेले फोन रेकॉर्डिंग सादर करण्यात आलेले नाही. सदर अहवाल समोर आल्यामुळे पोलीस आयुक्त पांडे यांनी पुढील चौकशीची धुरा आता आपल्या हातात घेतली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हि प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला गुजराथी यांचे निधन !
जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांच्या मातोश्री व दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला कांतीलाल गुजराथी...












