Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शासकीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करावे : डॉ. राजेंद्र गाडेकर

Oct 23, 2021

नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत बँकांना हयातीचे दाखले सादर करावे, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय सेवानिवृत्त वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या निवृत्ती वेतन अदा करणाऱ्या बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी संबंधित बँकेत प्रत्यक्ष हजर राहुन यादीतील त्यांचे नाव तपासून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. सोबत आपल्या पॅनकार्डची छायांकीत प्रत बँकेत सादर करून आपला दुरध्वनी क्रमांक नोंदवावा. यासोबतच प्रचलित व्यवस्थेव्यतिरिक्त निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या निवृत्तीवेतन धारकांनी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठयाचा ठसा दिला नसेल किंवा संगणीकृत जीवनप्रमाण दाखला सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन जानेवारी 2022 पासुन स्थगित करण्यात येईल. त्यामुळे निवृत्ती धारकांनी आपले हयातीचे दाखले बँकामार्फत किंवा ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र सुविधेमार्फत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये सादर करावेत. तसेच आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे 2021-22 या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर 2021 आयकर परिगणना बचतीचे कागदपत्र सादर करावे, असेही वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]