loader image

एका दिवसात 340 नागरिकांचे झाले लसीकरण !

Oct 24, 2021


मनमाड मधील दिवंगत जेष्ठ समाजसेवक कै.पन्नालालजी शिंगी आणि कै.किशोरजी नावरकर यांच्या स्मरणार्थ रा. स्व. संघ जनकल्याण समिती, एसएनजेबी संस्थेचे श्रीमती के.बी.आब्बड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व श्री. आर.पी. चोरडिया हॉस्पिटल चांदवड, रसिकलाल धारिवाल हॅास्पिटल नाशिक आणि संस्कृती संवर्धन समिती यांच्या वतीने उद्योगपती अजित सुराणा, डाॅ. सुनिल बागरेचा, डाॅ.प्रताप गुजराथी आणि डाॅ.रविंद्र राजपूत यांच्या सौजन्याने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ३४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

सदर शिबिरास नवीन शिंगी, सुभाष संकलेचा, मनोज बाफना यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष सतीश न्हायदे, संस्कृती संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण व्यवहारे, रत्नाकर घोंगडे, योगेश म्हस्के, सिद्धांत लोढा, सोमेश राजनोर, गोकुळ परदेशी, प्रमोद मुळे, गाडगीळ सर, डॉ दराडे तसेच रा स्व संघ जनकल्याण समितीचे विवेक हातेकर, रमाकांत मंत्री, प्रकाश कुलकर्णी आदीनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

रमाकांत मंत्री, डॉ.सुनील बागरेचा, डॉ.राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण व्यवहारे, सतीश न्हायदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जनकल्याण समितीचे निमंत्रक विवेक हातेकर यांनी शिबीर आयोजन केल्याबद्दल संस्थांचे आभार व्यक्त केले. रसिकलाल धाड़ीवाल हॉस्पिटलचे डॉ.विजय गावित, एस एन जे बी संस्थेचे डॉ.जांगडा, डॉ.कबाड़े व सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

कै.डॉ.सी.एच.बागरेचा यांना स्मृती दिनानिमित्त सामूहिक आदरांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.