Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड जेष्ठ नागरिक संघर्ष समितीतर्फे अभिनव आंदोलन !

Oct 25, 2021

मनमाडच्या नागरी सुविधांकडे नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड जेष्ठ नागरिक संघर्ष समितीतर्फे सोमवारी नगरपालिका प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. नगर पालिका प्रशासन नागरी सुविधांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असून नागरी सुविधामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा होत नसल्याचा आरोप समितीतर्फे करण्यात आला.

वागदर्डी धरणाचे वाया जाणारे पाणी, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न, बेवारस कुत्रे, रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे, नवीन रस्त्यांची होत असलेली निकृष्ट कामे तसेच सार्वजनिक मुताऱ्यांची दयनीय अवस्था, या प्रमुख मागण्यांकडे नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.२५) धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. 

समितीतर्फे शहरातील खड्ड्यांचा जाहीर लिलाव :

आंदोलना दरम्यान शहरातील खड्यांचा जाहीर लिलाव समितीच्या पदाधिकार्यानमार्फत करण्यात आला, या अभिनव आंदोलनाची शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

आंदोलनास राजेंद्र पारिक, नरेंद्र कांबळे, सुधाकर भाले, दिलीप आव्हाड, कृष्णाजी पगारे, रामभाऊ गवळी, भीमराज लोखंडे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]