loader image

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या बालकांना ५ लाखांच्या अनुदान मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप !

Oct 25, 2021


गेल्या दीड ते दोन वर्षात कोरोना विषाणूने अनेक घरे उध्वस्त केलीत, अनेक घरातील प्रमुख कर्तेच निघून गेले. या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनाने पाच लाखांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात दहा अनाथ बालकांना भविष्यासाठी, शिक्षणासाठी व संरक्षणासाठी पाच लाखांच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील जवळपास 38 बालकांना महिला व बाल विकास विभागामार्फत पाच लाखाच्या मुदतठेव प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. सुशील वाघचोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय...

read more
पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

   मनमाड :- येथील हुडको विभागात असलेल्या पंचशील सार्व. वाचनालामध्ये  मागील वर्षी महाराष्ट्र...

read more
.