Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड होणार – भाजप दिव्यांग आघाडीच्या मागणीला यश !

Oct 26, 2021

मनमाड नगर पालिका तर्फे दरवर्षी मिळणारी 5% दिव्यांग निधी दिला जातो. सदर निधी दिवाळी पुर्वी देण्यात यावा या मागणीसाठी भाजप दिव्यांग आघाडीतर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता, वारंवार पाठपुरावा करून देखील मागणी मान्य न झाल्यामुळे दि.५ ऑक्टोबर रोजी भाजपा दिव्यांग आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले होते. या मागणीला अखेर यश प्राप्त झाले असून सोमवार (दि.२५) रोजी या मागणीला मान्यता देण्यात आल्याचे पत्र नगर पालिका प्रशासनातर्फे प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे यांचे हस्ते देण्यात आले आहे.

मागणी मान्य केल्यामुळे दिव्यांग आघाडीतर्फे नगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, आगवणे साहेब, सुरेश शिंदे व दिव्यांग आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
लाड- पागे समितीनुसार चतुर्थश्रेणीतील मैल कामगारांना शासकिय सेवेत घेण्याची मागणी

लाड- पागे समितीनुसार चतुर्थश्रेणीतील मैल कामगारांना शासकिय सेवेत घेण्याची मागणी

नांदगाव : मारुती जगधनेलाड-पागे समिती नुसार इतर जातीचे मेहतर समाजाचे कर्मचार्यांना शासकिय नोकरीत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]