loader image
[ays_poll id=7]

श्रीराम जन्मभूमी मंगल अक्षदा कलश शोभा यात्रा मिरवणुकीने मनमाड शहरात भगवे चैतन्य

Dec 25, 2023


मनमाड शहरात व परिसरात गत 38 वर्षा पासून श्रीराम जन्मभूमी मुक्ती चळवळ अखंडित पणे चालवणाऱ्या आणि 1986 पासून श्रीरामनवमी निमित्ताने सलग 38 वर्ष भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूकी चे आयोजन करणाऱ्या ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट तर्फे आलेल्या श्रीराम जन्मभूमी मंगल अक्षदा कलशांची भव्य शोभा यात्रा मिरवणुक काढण्यात आली.श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथून पारंपरिक पद्धतीने निघालेल्या या मंगल अक्षदा कलश यात्रा मिरवणुकीची वैशिष्ट्य म्हणजे मिरवणूक मार्गा वर सुशोभीत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, त्यानंतर सनई चौघडा, भगवा ध्वजधारी घोडेस्वार युवती, पारंपरिक वारकरी संप्रदायाची भजनी मंडळे,वाद्यवृंद (बँड ), ढोल ताशा पथक, डीजे, मंगल अक्षदा कलश चा सुशोभीत रथ, श्रीराम, लक्ष्मण, सीता, श्री हनुमान यांचा जिवंत सजीव देखावा असणारा चित्ररथ,सर्व श्रीराम भक्त बालगोपाळ, जेष्ठ बंधू भगिनींना भगव्या टोप्या,हिंदू संस्कृती चे प्रतीक असणारे 50 पेक्षा जास्त मोठे भगवे ध्वज, या मिरवणुकीत महिला श्रीराम भक्त, व युवा श्रीराम भक्त यांची संख्या लक्षणीय होती या मिरवणुक मार्गा वर ठिकठिकाणी भव्य प्रमाणात शोभे च्या फटाके ची अतिशबाजी करण्यात आली, मनमाड शहरात अनेक ठिकाणी या मंगल अक्षदा कलशां वर पुष्पवृष्टी करण्यात आली मिरवणूक मार्गा वर या श्रीराम मंगल अक्षदा कलशाचे सुवासिनी द्वारे औक्षण करून ठिकठिकाणी आरती करण्यात आली .प्रभू श्रीरामांच्या घोषणानी संपूर्ण मिरवणूक मार्ग दुमदूमला सर्वत्र वातावरण अतिशय मंगलमय झाले ह्या मंगल कलश यात्रा मिरवणुकीत मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी पक्ष, संस्था, संघटना, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, संस्था,भजनी मंडळे,यांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, व हजारो च्या संख्येने हिंदू बंधू भगिनींनी सहभाग घेतला मिरवणूक मार्गा वर ही मिरवणूक पहाणे साठी नागरिकांनी दुतरफा मोठी गर्दी केली होती या मंगल अक्षदा कलश मिरवणूकीचा समारोप श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे करण्यात आला यावेळी मनमाड शहरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वेदिका महिला मंडळ चे मार्गदर्शना मध्ये सामूहिक श्रीरामरक्षा पठण संपन्न झाले. त्यानंतर मनमाड शहरातून 1990 व 1992 साली अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन मध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन कारावास भोगलेल्या आणि ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड चे संस्थापक सदस्य आणि कारसेवक श्री नितीन पुष्पकांत पांडे, श्री नाना आबाजी शिंदे, श्री नीलकंठ हरिभाऊ त्रिभुवन, श्री रमाकांत यशवंत मंत्री यांचा प्रतिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनमाड उपखंड तर्फे पुष्प देऊन ऋण गौरव करण्यात आला त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र, व श्री हनुमान ची महाआरती होऊन या मंगल अक्षदा कलश यात्रे ची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे आणि श्रीराम जन्मभूमी मंगल अक्षदा कलश शोभा यात्रा मिरवणूक चे आयोजन ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केले तर मिरवणूक साठी मनमाड शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन मध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर या मंगल कलश मिरवणूक मुळे संपूर्ण मनमाड शहरात वातावरण श्रीराममय झाले सर्वत्र या ऐतिहासिक मिरवणुकीची मोठी चर्चा होती.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.