येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून तब्बल ५ ठिकाणी घरफोड्या व २ मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लांबविलेल्या आहेत. अचानक चोरीच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर येवला शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पटेल कॉलनी, आनंद नगर, मोरे वस्ती या कॉलनी भागात ५ ठिकाणी चोरी करत धुमाकूळ घातला आहे. यात 5 ठिकाणी बंद घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडत चोरी केली तर परिसरातील राधाकृष्ण मंदिरातील दानपेटीतील रक्कम देखील चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर भागातील गणपती मंदिराची दानपेटी फोडत चोरट्यांनी त्यातील रक्कम देखील लंपास केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.













