loader image

उपोषणात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई – एसटी महामंडळ !

Oct 27, 2021


आजपासून एसटी कर्मचारी राज्यभर बेमुदत उपोषण करणार आहेत. पगार वेळेत मिळावा, रखडलेली देणी लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचीही मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे एसटीची सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपोषणात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा महामंडळातर्फे देण्यात आला आहे.

दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११२ कोटी रुपये जाहीर केले होते परंतु पाच टक्के महागाई भत्ता वाढ, अडीच हजार रुपये दिवाळी भेटीची घोषणा एसटी महामंडळाने केल्यानंतरही त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी जर एसटी सेवा कोलमडल्यास उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिपत्रक महामंडळाने काढले आहे. 


अजून बातम्या वाचा..

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल...

read more
रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल...

read more
.