loader image
[ays_poll id=7]

शाळकरी मुलांमध्ये ‘गँगवार’, एका विद्यार्थ्याची सुर खुपसून हत्या !

Oct 27, 2021

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद होती. आता राज्य शासनाने काही निर्बंध घालून शाळा व महाविद्यालये सुरु केली आहे. राज्यात सध्या आठवी ते दहावीचे वर्ग भरत असून सहामाही परिक्षा सुरु आहेत. शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातल्या एका शाळेत मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शाळेत दहावीच्या दोन गटात खेळण्यावरुन जबर हाणामारी झाली. यात एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शाळेजवळील प्रगती हॉस्पीटल इथल्या पाईलाईन ब्रिजवर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हा वाद इतका टोकाला गेला की तीन विद्यार्थ्यांनी एका पंधरा वर्षीय मुलाच्या छातीत सूरा खुपसला. तुषार साबळे असं या विद्यार्थ्याचं नाव असून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तुषारचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाच तोळ्याची पोत ओरबाडून चोरटे पसार ; कोटमगाव येथे घडला प्रकार

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाच तोळ्याची पोत ओरबाडून चोरटे पसार ; कोटमगाव येथे घडला प्रकार

कोटमगाव तालुका येवला येथे विवाह निमित्त आलेल्या नाशिक येथील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याची...

read more
चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

प्रांत कार्यालय येथील कोषागार अधिकारी सुनिल तडवी राहणार चांदवड यांनी तक्रारदार यांचे पाच ते सहा...

read more
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताब पूनावाला ह्याला फाशी द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेतर्फे सोमवारी निवेदन देणार

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताब पूनावाला ह्याला फाशी द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेतर्फे सोमवारी निवेदन देणार

दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर ह्या युवती च्या हत्याकांडा मधील मुख्य आरोपी आफताब पुनावाला...

read more
.