दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर ह्या युवती च्या हत्याकांडा मधील मुख्य आरोपी आफताब पुनावाला ह्याने हत्याकांड मधले सर्व आरोप कबूल केलेले असल्याने त्याला लवकरच फाशी देण्यात यावी हीच श्रद्धा वालकर हीला श्रद्धांजली ठरेल. या घटनेच्या निषेधार्थ मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा यांच्या वतीने जाहिर निषेध व ह्या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 21-11-2022. सकाळी 11 वाजता तलाठी कार्यालय, गांधी चौक येथे निवेदन देण्यात येणार आहे. सर्व आजी -माजी पदाधिकारी,युवासेना,महिला आघाडी व नगरसेवक व सर्व अधिकृत संघटनानी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

जय भवानी व्यायामशाळेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
आज रावेर येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय १७ व १९ वर्षाआतील मुले/मुलींच्या...