अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक आज नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक भास्करभाऊ कदम व तालुका समन्वयक अमोल खरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या बैठकीत उरळी कांचन येथे होणाऱ्या ४४ व्या पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला जाण्यासंबंधी चर्चा व नियोजन करण्यात आले. तसेच तालुकास्तरावरील पत्रकारांसमोरील अडी अडचणी यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्वच पत्रकार बांधवांनी आपआपले मते मांडत मराठी पत्रकार परिषद व जिल्हा मार्गदर्शक यांच्यावर विश्वास व्यक्त केला. याबैठकीस सर्व जिल्हा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे तसेच स्थानिक साप्ताहिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






