नांदगाव तालुक्याचे जेष्ठ नेते व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे नांदगाव तालुका संचालक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील हिसवळ खु. येथे शुक्रवारी (दि.२) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन दामोदर नामदेव आहेर, सौ. सुधाताई दामोदर आहेर यांचे हस्ते पार पडणार आहे.
कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
शिबिराचे आयोजन हिसवळ खुर्द, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, जय योगेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी,
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, दिलीपदादा पाटील मित्र मंडळ, नांदगाव तालुका सर्व शिक्षक कर्मचारी म.रा.वि.प्र.संस्था यांचे वतीने करण्यात आले आहे.













