loader image
[ays_poll id=7]

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर कामबंद आंदोलन : एसटी सेवा ठप्प !

Oct 28, 2021

आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारला आहे. त्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असून दिवाळी निमित्त शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात यावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता २८ % फरकासह अदा करण्यात यावा, घरभाडे भत्ता ७,१४,२१ टक्क्यांवरून ८,१६,२६ टक्के करण्यात यावा, राज्य सरकार प्रमाणे सण उचल १२,५०० रुपये दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी, दिवाळी पूर्वी १५००० रुपये बोनस देण्यात यावा, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या २ दिवसापासून बेमुदत उपोषण करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड आदिसह सर्वच आगारातून उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहतुकीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.