loader image

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

Oct 28, 2021


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट अत्यंत अल्प स्वरुपाची असल्याने एसटी कर्मचार्‍यांमध्ये याबद्दल तीव्र असंतोष आहे, असून एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात यावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता २८ % फरकासह अदा करण्यात यावा, घरभाडे भत्ता ७,१४,२१ टक्क्यांवरून ८,१६,२६ टक्के करण्यात यावा, राज्य सरकार प्रमाणे सण उचल १२,५०० रुपये दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी, दिवाळी पूर्वी १५००० रुपये बोनस देण्यात यावा, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या २ दिवसापासून बेमुदत उपोषण करीत आहेत.

नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज उपोषण करणाऱ्या कर्मचारी बांधवांची नांदगाव आगार येथे जाऊन भेट घेतली व उपोषणास जाहीर पाठींबा दिला. संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी अण्णासाहेब इप्पर, अरुण इप्पर, अण्णासाहेब बुरकुल, विशाल आव्हाड, किरण शिंनगारे, अण्णासाहेब भागवत, अफजल खान, भास्कर सोनवणे यांचेकडे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष कैलास पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष दया जुन्नरे, अतुल पाटील, पवन खैरनार आदि उपस्थित होते. 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.