महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट अत्यंत अल्प स्वरुपाची असल्याने एसटी कर्मचार्यांमध्ये याबद्दल तीव्र असंतोष आहे, असून एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात यावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता २८ % फरकासह अदा करण्यात यावा, घरभाडे भत्ता ७,१४,२१ टक्क्यांवरून ८,१६,२६ टक्के करण्यात यावा, राज्य सरकार प्रमाणे सण उचल १२,५०० रुपये दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी, दिवाळी पूर्वी १५००० रुपये बोनस देण्यात यावा, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या २ दिवसापासून बेमुदत उपोषण करीत आहेत.
नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज उपोषण करणाऱ्या कर्मचारी बांधवांची नांदगाव आगार येथे जाऊन भेट घेतली व उपोषणास जाहीर पाठींबा दिला. संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी अण्णासाहेब इप्पर, अरुण इप्पर, अण्णासाहेब बुरकुल, विशाल आव्हाड, किरण शिंनगारे, अण्णासाहेब भागवत, अफजल खान, भास्कर सोनवणे यांचेकडे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष कैलास पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष दया जुन्नरे, अतुल पाटील, पवन खैरनार आदि उपस्थित होते.













