loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेतून भाजपात गेलेले , ते , 10 नगरसेवक अपात्र !

Oct 30, 2021

शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या माथेरानमधील १० नगरसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अपात्र ठरवले आहे. | महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३ (१) आणि महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनहर्हता अधिनियम १९८७ च्या कलम ८ (१) मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांतर करणे या दहा जणांना महागात पडले आहे. अंतर्गत वादामुळे माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या १० नगरसेवकांनी २७ मे २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. कोल्हापूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. यानंतर शिवसेनेने या पक्षप्रवेशास आक्षेप नोंदवला. या सर्व १० नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करावे यासाठी शिवसेना सचिव अनिल देसाई व माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

२७ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार अर्जावर अंतिम सुनावणी पार पडली होती. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा निकाल दिला आहे. रुपाली तुकाराम आखाडे, प्रियंका विनोद कदम, ज्योती कैलास सोनावळे, प्रतिभा प्रदीप घावरे, संदीप नारायण कदम, सुषमा कुलदीप जाधव, आकाश कन्हैया चौधरी, राकेश नरेंद्र चौधरी, सबिना गुलमहोम्मद खान उर्फ सोनम सचिन दाभेकर या नऊ निवडून आलेल्या तर चंद्रकांत धोंडू जाधव या स्विकृत नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र ठरवले आहे. आगामी नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना जोरदार धक्का बसला आहे.

अजून बातम्या वाचा..

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर...

read more
सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार...

read more
सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच...

read more
बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

अमरावतीत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबिरातून परतत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या ट्रॅक्‍टरला अपघात...

read more
इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नाती व नांदगाव चे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या...

read more
कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण

कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण

मुंबई/नाशिक, दि.२० फेब्रुवारी २०२३ : मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे...

read more
.