नांदगाव तालुक्यातील आगामी स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका संदर्भात व पक्षाचे नांदगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी नांदगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची रविवार दि,३१ रोजी तातडीची बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मालेगाव रोड वरील हॉटेल वृंदावन येथे दुपारी १२ वाजता या बैठकीचे व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या बैठकीचे आयोजन ज्येष्ठ नेते शंकरराव काकळीज यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थिती रिपाईचे जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ अहिरे, रिपाइंचे जिल्हासचिव कपिल तेलुरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धीवर, नांदगाव तालुका अध्यक्ष कैलास अहिरे, जिल्हा सरचिटणीस मालेगाव भारत जगताप, होलार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, रिपाईचे ज्येष्ठ नेते दादाजी महाले, बापू खैरे, राजाभाऊ पवार, मातंग आघाडी तालुकाध्यक्ष राजाभाऊ गुडेकर, युवा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेश गांगुर्डे, गोरख चौधरी, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, मनमाड शहर अध्यक्ष दिलीप नरवडे, मोहित थोरात, आकाश थोरात, भिका खटके, अन्वर भाई इनामदार, सखाराम सोनवणे, योगेश अहिरे व सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते यांनी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक बाळासाहेब बोरकर यांनी दिली आहे.













