loader image

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस 265 रुपयांनी महागला !

Nov 1, 2021


देशात दिवसेंदिवस महागाई नवनवीन उच्चांक गाठत आहे. पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठल्यावर आता ऐन दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.