मागील महिन्यात मनमाड शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे HAK हायस्कूल मागील रहदारीचा पूल हा वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे सदर पुलावरून शहराच्या सिकंदर नगर, डॉ.आंबेडकर नगर, किर्ती नगर, माऊली नगर, तिरंगा नगर, गौसिया नगर, बुरकूलवाडी भागातील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांना येण्या-जाण्यासाठी असुविधा निर्माण झाली होती. विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे मार्फत समाजसेवक बबलू शेख यांना वारंवार तक्रार येत होती. सदरील पुर येण्या-जाण्यासाठी त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहर उपप्रमुख खालीद शेख यांनी नगरसेवक विनय आहेर यांचेकडे केली तसेच नगरसेवक विनय आहेर यांनी गटनेते गणेश धात्रक यांच्याशी संपर्क साधत परिस्थितिची समक्ष जाऊन पाहणी केली व गणेश धात्रक यांनी त्वरित प्रशासनास सूचना करीत पुलाचे काम मुरूम टाकून सुरू केले.
पूल पुन्हा रहदारीसाठी खुला करण्यात आल्यामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच गटनेते गणेश धात्रक, नगरसेवक विनय आहेर, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपशहरप्रमुख खालिद शेख, रईस फारुकी, सुरज चावरिया, रवी खलसे, चौधरी साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.










