Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे अहिंसा चौक लोकार्पण सोहळा संपन्न!

Nov 1, 2021

अहिंसा हाच मानवाचा परम धर्म आहे, अहिंसेनेच जीवनाचा उद्धार होवू शकतो, भगवान महावीरांच्या या शिकवणीचा खऱ्या अर्थाने सन्मान करीत नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी मात्र महिनाभरात दिलेला शब्द पूर्णत्वास नेला. 
नांदगाव शहराच्या सुंदरतेत मोठी भर आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून पडली आहे. नांदगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या जुन्या पंचायत समिती कार्यालयाजवळ अहिंसा चौक उभारत सुहास कांदे यांनी राष्ट्रसंत गुरुमा गनिनी अर्यिका 105 श्री सुप्रकाशमतीजी माताजी यांना दिलेला शब्द मात्र महिन्याभरातच पूर्ण केला. रविवार दि.३१ रोजी या अहिंसा चौकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

राष्ट्रसंत गुरुमा गनिनी अर्यिका 105 श्री सुप्रकाशमतीजी माताजी यांच्या उपस्थितीत, आमदार सुहास कांदे आणि सौ.अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अहिंसा चौक लोकार्पण सोहळ्याने नांदगाव नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना नांदगाव शहरातून व्यक्त होत आहे.

सदर कार्यक्रमास नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवाडे तसेच जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]