loader image

वैजापूरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा !

Nov 3, 2021


राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

जिल्ह्यातील वैजापूर येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र बाप गेल्या वर्षभरापासून लैंगिक छळ करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या बापासह आणखी एक जण मुलीवर अत्याचार करत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून या सगळ्या भयंकर प्रकारासाठी मुलीच्या आईचीही सहमती असल्याचे समोर आले आहे. या सावत्र बापासह अन्य एकजण आणि आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. परंतु सावत्र बापाची या मुलीवर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे करत होता. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही तिचा लैंगिक छळ करत होता. हे कृत्य मुलीने आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली.

मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या या दोघांनी वर्षभरापासून तिचा छळ केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर 24 ऑक्टोबर रोजी बापाने मुलीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली. त्रास होऊ लागल्यावर मुलगी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. ती मावशीकडे गेल्यानंतर धमक्या देण्यासाठी इतरांना पाठवले गेले. पण मावशीने त्यांना पिटाळून लावत थेट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हा घृणास्पद प्रकार ऐकून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सेवकाचे मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना महिला...

read more
गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६...

read more
मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत

धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत

बिहार राज्यातील मजूर अमर रामकृष्ण वय 29 वर्ष, धंदा- मजुरी, रा.मु.पो.बलेख जि. खागरिया राज्य बिहार...

read more
.