मनमाड : अवघ्या एक दिवसांवर आलेल्या लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली आहे.

दिवाळी सणानिमित्ताने लागणाऱ्या पणत्या , लक्ष्मी मुर्ती, फराळाची दुकाने, आकाशकंदील, लाह्या-बत्ताशे, झेंडूची फुले, फटाके, नवीन कपडे आदी प्रकारच्या वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज बाजारपेठेत गर्दी केली आहे.सध्या महागाई वाढलेली असली तरी वर्षातील सर्वात मोठा असणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी काटकसर करून आप-आपल्या परीने नागरिक हे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत असतात. दिवाळी मध्ये सोने खरेदी करण्याला देखील महत्व असल्याने नागरिक हे सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारातील अनेक दुकानात गर्दी करत आहे.












