loader image
[ays_poll id=7]

नाशिकमध्ये 43 प्रभाग 3 सदस्यीय तर एका प्रभागात ४ उमेदवार!

Nov 4, 2021


आधीच्या १ सदस्य प्रभाग रचना जाहीर झाल्यावर राज्य शासनाने तीन सदस्यीय प्रभागरचना जाहीर केली. त्यामुळे आता नाशिक महानगर पालिकेतील नगरसेवक संख्या १२२ वरून १३३ वर जाऊन पोचली आहे. फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीच्या 133 जागांसाठी कच्च्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर एक 4 सदस्यीय राहील.

नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे जुन्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 अशी करण्यात आली. सध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभागरचना आहे. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू झाले. ते 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचे होते. त्यानुसार नाशिक महापालिकेत 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर एक 4 सदस्यीय राहणार असल्याचे समजते.

 

सुरुवातीला निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. मात्र, आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा या कामात बदल करावा लागणार आहे. 


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
.