Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा….!

Nov 6, 2021

दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दिपोत्सवही या दिवशी केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.याच दिवसाचे ओचीत्य साधुन मनमाड येथील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या कमलाक्षाय गणेश मंदिरामध्ये पाडवा पहाटेला दिपोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे गणेशाची पुजा करून भजन म्हणुन, सुंदर अशी रांगोळी काढुन , सुवसनिणींकडुन श्रीगणेशाची आरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिला भाविक उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये...

read more
नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव : मारुती जगधने जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]