Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

२१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या …..

Nov 6, 2021

इंस्टाग्रामवरील अकाऊंट डिलीट करण्याच्या वादातून २१ वर्षीय तरुण शिवम पवार याची ४ ते ५ तरुणांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मनमाड रेल्वे स्थानकावर घडली.शिवम पवार हा चांदवड तालुक्यातील उसवाड येथिल रहिवाशी आहे कल्याण येथील मुलीसोबतच्या प्रेम संबंधातून हत्या झाल्याचे समोर येत आहे.अगोदर चोऱ्या, मारामाऱ्या, अव्हैध धंदे आदींमुळे चर्चेत असलेले मनमाडचे रेल्वे जंक्शन आता खुणामुळे चर्चेत आले आहे. इंस्टाग्रामवरील अकाऊंट डिलीट करण्याच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मनमाड रेल्वे स्थानकावर रात्री २ च्या सुमारास घडली. शिवम पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चांदवड तालुक्यातील उसवाड येथील रहिवाशी आहे. शिवमचे कल्याण येथे राहणाऱ्या एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधातून त्याने इंस्टाग्राम अकाउंट खोलले होते हे अकाउंट बंद करण्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होते. वाद मिटविण्यासाठी तरुणीने त्याला मनमाड रेल्वे स्थानकावर भेटण्याचे ठरले होते. मात्र येतांना ही तरुणी एकटी आली नाही तर तिच्या सोबत चार ते पाच तरुण आले. रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३ व ४ मधील गार्डन जवळ मुलीसोबत आलेल्या या ४ ते ५ तरुणांनी शुभमला बेदम मारहाण करीत चाकूने सपासप वार केले चाकूने भोकसल्याने त्याचा मृत्यू झाला.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

सलग दोन जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक राष्ट्रीय युथ व खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक...

read more
मतदारसंघातप्रत्येक घरा घरात २४ तास पाणी यावे हेच माझं स्वप्न – आमदार कांदे जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा संपन्न

मतदारसंघातप्रत्येक घरा घरात २४ तास पाणी यावे हेच माझं स्वप्न – आमदार कांदे जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा संपन्न

नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]