loader image

पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

Nov 6, 2021


 

 मनमाड :- येथील हुडको विभागात असलेल्या पंचशील सार्व. वाचनालामध्ये  मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत  स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुमारे अडीज लाखांची १५१ पुस्तके आलेली आहेत . सदर पुस्तकांचा विध्यार्थाना उपयोग होतो किंवा नाही तसेच आजपर्यंत किती विद्यार्थानी या पुस्तकांचा लाभ घेतला या बाबतची तपासणी करण्यासाठी नाशिक येथील जिल्हा नियोजन अधिकारी श्री. हेमंत आहिरे यांनी नुकतीच वाचनालयाला भेट दिली. तेव्हा वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह एस. एम. भाले यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण माहिती उपलब्द करुन दिली. तसेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा देणार्या  सुमारे २९ विद्यारथ्यांनी या पुस्तकांचा आजपर्यंत लाभ घेतल्याचे वाचनालयाचे देवाण-घेवाण रजिस्टर वरुन निदर्शनास आले. त्याबद्दल त्यांनी वाचनालयाचे कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन चांगला शेरा दिला . यावेळी विध्यार्थापैकी सचिन जाधव, शुभम जाधव, मनीष शर्मा, स्वप्नील बोदडे , प्रतीक्षा धिवर , काजल पगारे, विश्वास भंडारे, प्रेम भंडारे यांचेसह लिपिक राकेश पगारे, ग्रंथपाल प्रमोद शेजवळ इत्यादी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.