Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांची प्रा.नितीन लालसरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..!

Nov 8, 2021

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी दिवाळी निमित्ताने राज्याचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रा.नितिन लालसरे यांच्या मनमाड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

मनमाड शहराचे भुमीपुत्र असणारे प्रा.नितिन लालसरे हे नामदार एकनाथ शिंदे यांचे लोकप्रिय अधिकारी असुन हे नेहेमी लोकांच्या मदतीसाठी कार्यरत असतात. यामुळे त्यांना मानणारा सम्पूर्ण राज्यभर खुप मोठा वर्ग असल्याने अत्यंत कमी कालावधी मध्ये प्रा. लालसरे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या मनामध्ये आदराचे स्थान मिळवले आहे. दिवाळी निमित्ताने नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी प्रा.नितिन लालसरे यांची भेट घेऊन त्यांना दिवाळी निमित्ताने शुभेच्छा दिल्या, या वेळी प्रा.लालसरे आणि त्यांचा संपुर्ण कुटुंबाच्या वतीने आमदार कांदे यांचे स्वागत करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील विकास कामांसाठी आमदार सुहास कांदे हे नेहमी तत्पर असून प्रा.लालसरे हे देखील आपल्या पदाच्या माध्यमातून नांदगाव तालुका आणि मनमाड शहरातील विकासकामांसाठी नेहेमीच प्रयत्न करत असतात.

यावेळी मनमाड शहर शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, युवा सत्ता मंचचे सदस्य, जितु धिंगाण मित्र मंडळाचे सदस्य, नितीन लालसरे मित्र मंडळाचे सदस्य आणि मनमाड शहर शिवसेनेचे पदाधिकारी आणि लालसरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]