loader image
[ays_poll id=7]

भुजबळ-कांदे वादात आता मुख्यमंत्र्यांची एन्ट्री !

Nov 9, 2021


गेल्या महिन्यात संपूर्ण राज्यात गाजलेले भुजबळ-कांदे वाद दररोज नवनवीन वळणे घेत असून आता या संपूर्ण प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. 

गेल्या महिन्यात नियोजन समिती निधी वाटपात नांदगाव तालुक्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत आमदार कांदे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती व उद्धव ठाकरे यांचेकडे सर्व पुराव्यानिशी तक्रार करीत भुजबळ यांचे पालकमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली होती. आमदार कांदे यांच्या पत्राची आता मुख्यमंत्र्यांनी दाखल घेतली असून नियोजन समितीच्या निधी वाटप व विकास कामासंबंधी सर्व शासकीय दस्त मागविलेले आहेत. आता मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर काय निर्णय घेतात हीच उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.