महाराष्ट्र भर सुरु असलेला एस.टी.कामगारांचा आपल्या न्याय हक्कासाठी संप सुरु असून मनमाड एस. टी. कामगार संघटना यात सहभागी असुन गुरुवार दि. ११/११/२०२१रोजी मनमाड सिटू कामगार संघटना व एन. आर. एम, यु. ओपन लाईन रेल्वे कामगार संघटना च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने लवकर निर्णय घेऊन एस.टी.कामगारांना न्याय द्यावा. सामान्य जनतेला होणारा त्रास थांबविण्यात यावा. अन्यथा सर्व कामगार संघटना आंदोलन पुकारेल असा ईशारा देण्यात आला.वेळी सिटू चे कॉ.रामदास पगारे. कॉ. किशोर आहिरे. कॉ जॉनी जॉर्ज. कॉ.विकास गायकवाड.कॉ.हाजी असलम शेख.कॉ.रविद्र वाघले.कॉ.उमेश सोनवणे. कॉ.अमोल बागुल. कॉ. आनंद पांडे. एन. आर. एम. यु चे कॉ. अंबादास निकम. कॉ. शबरीश नायर.उपस्थित होते.
एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...










