loader image
[ays_poll id=7]

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन !

Nov 15, 2021


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबासाहेब पुरंदरेचे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं होतं. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला होता. नुकतेच त्यांनी १०० व्या वर्षात प्रदार्पण केले होते. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण प्लेगच्या साथीमुळे त्यांना पुण्यात स्थलांतर करावे लागले होते. वडील मोरेश्वर पुरंदरे हे पुण्यात भावे शाळेत चित्रकला शिक्षक होते. त्याच शाळेत बाबासाहेबांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये त्यांनी ज्युनिअर बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले होते.

बालपणापासूनच इतिहासाचे असलेले प्रेम उत्तरोत्तर वाढतच गेले. वयाच्या १६व्या वर्षापासून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे, उज्ज्वल परंपरेचे अभ्यासपूर्ण संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत. ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. ‘इतिहास’ माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे बाबासाहेब म्हणत. 

१९ ऑगस्ट २०१५ रोजी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. पुरंदरे यांच्या अव्याहत आणि अथक अशा ‘ऐतिहासिक’ कार्याची दखल भारत सरकारने घेतली असून २०१९ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ने सन्मानित केले होते.

अशा या थोर इतिहास महापुरुषास विनम्र आदरांजली !


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.