मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अतिप्राचीन अनकाई किल्ला येथील अगस्ती आश्रम येथे चातुर्मास पूजेचे दि.१६ नोव्हेंबर रोजी स.१० वा. आयोजन करण्यात आले आहे. चातुर्मास पूजेनिमित्त महामंडलेश्वर शिवगिरिजी महाराज यांचे प्रवचन व तुकाराम महाराज वाजे यांचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी आयोजित कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे निवेदन अगस्ती आश्रमचे महंत ज्ञानेश्वर माऊली यांनी केले आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ.माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर
मनमाड: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे...










