Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आज कार्तिकी एकादशी….तुलसी विवाहास प्रारंभ!

Nov 15, 2021

आज कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते ,
ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात.पंढरपूरला या एकादशीला मोठी यात्रा भरत असते.

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..

मनमाड शहरातील श्री बालाजी विठ्ठल मंदिर(नाईकांचे) , वेशीतील विठ्ठल मंदिर , बुधलवाडी येथील माऊली मंदिर ,श्री गजानन महाराज मंदिर येथे गेल्या कोजागिरी पौर्णिमेपासुन दररोज पहाटे काकडा भजनाचे आयोजन करण्यात आले आहे , पहाटे पाच वाजल्या पासुन मंदिरामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत असुन परीसरातील वातावरण भक्तिमय होत आहे.आज कार्तिकी एकादशी निमित्ताने शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये सुंदर अशी सजावट करण्यात आली असुन अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजचा दिवस पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.

अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]