Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड ते मनमाड रस्त्याचे कॉक्रीटीकरण आराखड्यात बदल करावे : चांदवड वासियांचे निवेदन !

Nov 15, 2021

चांदवड सबस्टेशन ते महामार्ग चौफुली या रस्त्याच्या आराखड्यात बदल करणे बाबत व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत  एम.एस.आर.डी.सी.नाशिक येथील अभियंत्यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
चांदवड ते मनमाड या रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू असून ठेकेदारामार्फत मनमाड-चांदवड चौफुलीपासून रस्त्याच्या लगत अंतर्गत गटारीचे काम सुरू आहे. सदर गटारीची उंची जमिनीपासून ४ फुट उंच असून सदर गटारीमुळे चांदवड बाजारपेठेचा पारंपारीक येणे – जाणेचा रस्ता बंद झालेला असून नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बाजारपेठेपासून पेट्रोलपंपापर्यंत ड्रेनेजची उंची जमिनीपासून वर असून कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचे गाळे व रेणुका कॉम्प्लेक्सचे गाळे पाण्याखालील जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यातील दुभाजकावर स्ट्रीटलाईट, सबस्टेशन चांदवड ते पेट्रोलपंप चौफुलीपर्यंत बसविण्यात यावे., या व इतर मागण्यांचे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. निवेदनात सुचविल्याप्रमाणे लोकहित लक्षात घेऊन नकाशात बदल करण्यात यावा व नागकरीकांची गैरसोय टाळावी अन्यथा समस्त चांदवड वासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर चांदवड तालुका शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले,पांडूरंग भडांगे,शांताराम घुले उमेश जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत.

अजून बातम्या वाचा..

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]