Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !!

Nov 17, 2021

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवतीर्थावरील त्यांच्या स्मारकावर माथा टेकवून आदरांजली अर्पण केली.

आज शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिन. दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लक्षावधी शिवसैनिक शिवतीर्थावर वंदन करण्यासाठी दाखल होत असतात. गेल्या वर्षी कोरोनानिमित्त याला मर्यादा आली होती. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात जनसागर शिवतीर्थावर असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आज शिवतीर्थावर माथा टेकवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल्य विचारांना प्रमाण मानून आपण एक नेता, एक विचार आणि एक झेंडा हाती घेऊन आजवर वाटचाल केली असून भविष्यातही हा समाजकारणाचा वसा जोपासणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याप्रसंगी केले.

अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]