Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….!

Nov 18, 2021

कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.

वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते. 
आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात.
वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.

मनमाड येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हरी-हर भेट पुजा संपन्न करण्यात आली.यावेळी भाविकांकडुन रात्री बारा वाजता श्री महाविष्णूंच्या फोटोला शिव नामावली मंत्र म्हणुन 108 बेलपत्र वाहण्यात आले , तर सकाळी 6 वाजता श्री महादेव पिंडीला श्री विष्णु सहस्त्रनामावली म्हणुन 1000 तुळशी पत्र वाहण्यात आले.याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]